ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक एक्स पोस्ट, वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साद
दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलंय, पाहूयात...
ठाकरेंच्या शिवसेनेची आणखी एक सूचक एक्स पोस्ट सध्या चर्चेत आलीय. 'वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार अशी पोस्ट करण्यात आलीय. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेनं साद घातलीय. ठाकरे बंधूंच्या साद प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नवी एक्स पोस्ट चर्चेत आलीय. मात्र अशा पोस्ट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी रोज सकाळी करत आहोत, सर्वच मराठी लोकांनी मराठी अस्मितेसाठी एकत्र यावं असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय.